आयुष्यातची वाटचाल
नको तो स्मार्ट फोन, कीपॅड असला तरी चालेल मला, पण मनातल्या गोष्टी सांगायला, सांगायला हक्काची माणसं हवी मला! मनोरंजनासाठी त्या स्मार्ट फोन मधली, विदेशी फेसबुक आणि इंस्टाग्राम, असली ऍप नसली तरी चालेल, हा पण सर्व अपडेट साठी, सकाळी येणारा तो न्यूज पेपर द्या मला! स्वप्न माझी थोडी मोठी उडायला, पंख नको देवा मला, स्वप्न पूर्ण करण्या साठी मोठं, मोठी पुस्तकाल्या गोष्टी आत्मसाद, करायला थोरांचा डोकयावर हात हवा मला, नको खूप लोकांची गर्दी, समजवणारी जवळची मैत्री हवी मला! दुसऱ्यांनी केलेला अपमान नाही, सहन होत मला, पण याच छोट्या गोष्टीतून, आयुष्यात कस जगायचं हे नक्की शिकवेल मला! जगाच्या पाठीवर माझं नाव नको मला, पण ससा सारखं उड्या न मारता, कसावा सारखं हळू हळू चालून, बस माझं छोटंसं स्वप्न पूर्ण, करायचं बळ हवं मला! चेतना लांजेवार